घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी घेतली पोलिसांची झाडाझडती

पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी घेतली पोलिसांची झाडाझडती

Subscribe

नूतन पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी शहरातील मेळा बसस्थानकालगत असलेल्या तालुका पोलीस ठाण्याची पाहणी केली. त्यावेळी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसताच सिंह यांनी झाडाझडती घेतली.

नूतन पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी शहरातील मेळा बसस्थानकालगत असलेल्या तालुका पोलीस ठाण्याची पाहणी केली. त्यावेळी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसताच सिंह यांनी झाडाझडती घेतली. पाहणी सुरू असल्याची खबर मिळताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी शनिवारी, ३ मार्चला पदभार स्विकारला. त्यानिमित्त त्यांनी बुधवारी, ६ मार्चला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पत्रकारांशी तालुका पोलीस ठाणे येथे संवाद साधला. पत्रकार परिषदेनंतर त्या थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निघाल्या. पदभार घेतल्यानंतर पहिलाच दौरा असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विभागात रजिस्टर व पोलीस जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दौऱ्याची खबर मिळताच पोलिसांचीही धावपळ उडाली. पोलीस अधिकारी व पोलीस हवालदार विभागात येताच सिंह यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -