घरमहाराष्ट्रनाशिकउत्पादन शुल्कच्या कारवाईत ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्कच्या कारवाईत ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Subscribe

सिन्नर महामार्गावरील कारवाईत मद्यसाठ्यासह कार ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी, १८ एप्रिलला सिन्नर-पुणे महामार्गावर कारवाईत करत एका कारसह मद्यसाठा जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत पथकाने गेल्या चार दिवसांत विविध कारवाईत ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

विभागीय उपायुक्त पी. पी. सुर्वे आणि अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पुणे महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी करत असताना, सिन्नरजवळील मारुती मंदिरासमोर पथकाने एका कारला (एम.एच.०४, डी.एन. १२३६) थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहनचालकाने पळ काढताच पथकानेही पाठलाग करुन वाहन रोखले. या गाडीत देशी-विदेशी मद्याचे २३ बॉक्स आढळून आले. निरीक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक एस. ए. गायकवाड, लिलाधर पाटील, मोरे, कर्मचारी सुनील टापरे, संतोष बोऱ्हाडे, संजय शिंदे व गोकुळ शिंदे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, पथकाने गेल्या चार दिवसांत मद्यविक्री व वाहतुकीचे २७ गुन्हे दाखल करत त्यातील २७ संशयितांना अटक केली. या सर्व घटनांमध्ये देशी-विदेशी मद्याचे ३९ बॉक्स पथकाने जप्त केले. मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनांसह मद्यसाठ्याची किंमत ४ लाख ६ हजार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -