घरमहाराष्ट्रनाशिकएसटी वाहक महिलेची एकुलत्या एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या

एसटी वाहक महिलेची एकुलत्या एक मुलासह रेल्वेखाली आत्महत्या

Subscribe

लासलगाव स्थानकावर रविवारी मध्यरात्रीची घटना

लासलगाव : येवला बस आगारात वाहक असलेल्या अंजली राजेश भुसनळे (47, रा. विठ्ठलनगर, निलंबरी कॉम्लेक्स, औरंगाबाद रोड) यांनी मुलगा उत्कर्ष (वय 27) याच्यासह रविवारी मध्यरात्री दोन च्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे जाणार्‍या मार्गावर कि.मी. 233 च्या पोल क्र. 22/23 च्या दरम्यान मध्यरात्री ऐकमेकांचे हात ओढणीने बांधून रेल्वे खाली उडी मारुन जीवनयात्रा संपवली. अंजली आणि त्यांच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

- Advertisement -

अंजली भुसनळे या 15 ते 16 वर्षांपासून मृत पतीच्या जागेवर येवल्यात अनुकंपावर नोकरीस होत्या. उत्कर्ष हा नाशिक येथे नोकरीला होता. लॉकडाऊननंतर तो घरुनच काम करत होता. 3 ते 4 महिन्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये त्याचा विवाह झाला होता. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -