घरमहाराष्ट्रनाशिकएकलव्यचे विद्यार्थी महिन्यापासून घरीच

एकलव्यचे विद्यार्थी महिन्यापासून घरीच

Subscribe

आदिवासी विकास विभागाकडून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली

एकलव्य मॉडर्न रेसीडेन्सी स्कूलमध्ये केंद्राच्या सिबीएसई पॅटर्ननुसार अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक नसताना नाशिक, नगर, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातील 120 विद्यार्थी निवडण्यात आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचा एकलव्यमध्ये प्रवेश झालेला नाही. चालु वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन दोन महिने झाले तरी, हे विद्यार्थी घरीच असल्याने आदिवासी विकास विभागाकडून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली झाली आहे.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता सहापासून इंग्रजी शिक्षण देण्यासाठी केंद्राच्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळा आदिवासी विकास विभागाने सुरू केलेल्या आहेत. या शाळांमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गत फेब्रुवारी महिन्यात इंग्रजी, गणित, सर्वसामान्य आदी 100 गुणांची पात्रता परीक्षा घेतलेली होती. तिचा निकाल मार्च महिन्यात जाहीर करून उत्तीर्ण झालेल्या 120 विद्यार्थ्यांचे प्रवेश मे महिन्याअखेर त्या-त्या भागातील एकलव्य मॉडर्न रेसीडेन्सी स्कूलमध्ये करण्याचे आवाहन केलेले होते. चालु शैक्षणिक सत्रात नाशिकसह दिंडोरी, चणकापूर, इगतपुरी, अजमेर सौंदाणे, नंदूरबार येथील एकलव्य शाळेत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने पालकांना केलेले होते. त्यानुसार पालकांनी जातीचे दाखले, रहिवास दाखला, बॅकेत विद्यार्थी खाते उघडण्यासाठी 2 ते 3 हजार रूपये खर्च करीत कागदपत्रे जमविले होते. त्यानंतर ज्या एकलव्य शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला होता. ती शाळा गाठली तेव्हा त्यांना तेथे सीबीएसई पॅटर्नचे स्कूल नसल्याचे आढळून आले. चणकापूर आश्रमशाळेत सीबीएसई पॅटर्न शिकविणारे शिक्षकही नाहीत, तर त्या स्वरूपाची इमारतही नाही. दिंडोरी येथील एकलव्य शाळेत अपूरी सुविधा आहे. त्यामुळे पालकांनी येथे मुलांचे शिक्षण कसे होणार, असा सवाल संबंधितांना केला. ज्या आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश अशा शाळांमध्ये 100 टक्के होणार असल्याने त्यांच्या पूर्वीच्या शाळांनी त्यांचे दाखले तयार करून त्यांना एकलव्य शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा त्या शाळेत बसु शकत नाही. एकलव्य शाळेत इंग्रजी माध्यम शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रही सुरु झालेले नाही. गत 17 जूनपासून हे विद्यार्थी घरीच असल्याने पालकांना शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

चणकापूर येथील आश्रमशाळेत एकलव्य निवासी शाळा सुरु करण्यात आल्याचे पालकांना सांगण्यात आल्याने या शाळेत सुमारे 60 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रास्तावित आहेत. मात्र येथे सीबीएसई अभ्यासक्रम शिकविणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर नवीन इमारतही नाही. आहे त्याच आश्रमशाळेत विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या आश्रमशाळेचे मुख्याध्यापकही बदली झालेले आहेत. पालकांनी मुलांचे प्रवेश करून घ्यावेत, असे येथील आश्रमशाळा व्यवस्थापनाचा पालकांना आग्रह करण्यात आला होता. पण शिक्षक आणि सीबीएसई पॅटर्नच्या शैक्षणिक सुविधा नाही. राहण्याची नीट सोय नसल्याने पालकांनी येथे पाल्यांना प्रवेश करून घेण्यास चिंता व्यक्त केली आहे.

दिंडोरीतील विद्यार्थी हलविले

दिंडोरी येथील एकलव्य मॉर्डन रेसीडेन्सी स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांचा वाणवा, अपूर्‍या शैक्षणिक सुविधा आणि राहण्यासाठी गैरसोय असल्याने येथील विद्यार्थ्यांची रवानगी त्यांच्या पालकांनी इगतपुरी, नाशिक आणि नंदूरबार येथील शाळेत केली आहे. काही प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सौंदाणे अजमेर येथील शाळेत करण्यात आलेले आहे. मात्र, मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे.

- Advertisement -

तासिका तत्वावर शिक्षक घेणार

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांचे आऊटसोर्सिंग करावे, असा सूचना वरिष्ठस्तरावरून आलेल्या आहेत. त्यामुळे तासिका तत्वावर इंग्रजी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यांच्या उद्या (दि.19) मुलाखती घेण्यात येणार आहे. पूर्वीच शिक्षक भरती करण्यात येणार होती. मात्र, त्याला विलंब झाला त्याचा त्रास पालकांना सहन करावा लागला आहे. मात्र, शिक्षक भरती करून घेत ही अडचण दूर केली जाणार आहे. – डॉ. पंकज असिया, कळवण प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -