घरमहाराष्ट्रनाशिकJEE Mains : रसायनशास्त्राने फोडला विद्यार्थ्यांना घाम

JEE Mains : रसायनशास्त्राने फोडला विद्यार्थ्यांना घाम

Subscribe

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा: दोन सत्रात एक हजार 150 विद्यार्थ्यांची हजेरी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी जॉईंट एण्ट्रन्स एक्झाम (जेईई) अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा घेण्यात आली. रविवारी (दि. 27) दोन सत्रात झालेल्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील एक हजार 150 विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षेत रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नांनी चांगलाच घाम फोडल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्तरावरील रविवारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देशभरात पार पडली. ऑनलाइन स्वरूपात झालेल्या या परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. सध्याच्या वेळापत्रकानुसार 5 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वतः मास्क आणण्याच्या सूचना केलेल्या होत्या. केंद्रांवर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते. तसेच, विद्यार्थ्यांना स्वतःचे सॅनिटायझर आणण्याचा विकल्प उपलब्ध होता. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेशासाठी वेगवेगळी वेळ दिलेली होती. तसेच, वर्ग व अन्य तपशीलाची माहिती प्रवेशपत्रावरील बारकोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळाली.

- Advertisement -

आरोग्यविषयीचे हमीपत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेले होते. तत्पूर्वी जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी व सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या जेईई मेन्स परीक्षांतून पात्रता मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षा दिली. नाशिक शहरातील विविध केंद्रांवर एक हजार 283 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यापैकी एक हजार 150 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पेपर क्रमांक एक घेण्यात आला. तर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पेपर क्रमांक दोन घेण्यात आला. दोन्ही पेपरच्या मधल्या काळात विद्यार्थ्यांना जेवणासाठी बाहेर सोडण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -