घरमहाराष्ट्रनाशिकपारदर्शक मतदानासाठी मतदान यंत्राची सरमिसळ

पारदर्शक मतदानासाठी मतदान यंत्राची सरमिसळ

Subscribe

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १८ उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिटसची आवशकता आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १८ उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिटसची आवशकता आहे. यासाठी अतिरिक्त बॅलेट युनिटची पुरवणी सरमिसळीकरणाची (सप्लिमेंटरी रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे शनिवारी दि १३ एप्रिल रोज़ी दुपारी १२.३० वाजता पूर्ण करण्यात आली.

मांढरे यांनी इलेकट्रॉनिक वोटींग मशिन व व्हिव्हिपॅट यंत्राबाबतच्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना असलेल्या सर्व शंकांचे निरसन करुन संपूर्ण मतदान प्रक्रिया समजुन घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा ११६ टक्के बॅलेट युनिटस संबधित मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना वितरीत करण्यात आलेली आहेत. संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने सरमिसळ पुरवणी फेरी कशारितीने पूर्ण होईल याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्वांना माहिती दिली. सदर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय अतिरिक्त बॅलेट युनिटस चे वाटप होणार आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक उमेदवाराने कामकाज सोयीचे होण्यासाठी आपल्या स्तरावरुन मतदान प्रतिनिधी नेमताना त्याच मतदान केंद्रातील रहिवाश्याची नेमणूक करावी. सखी मतदान केंद्रात महिला पोलिंग एजंट नेमण्याची सूचना आनंदकर यांनी यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना केली. मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी सरिता नरके, श्रीनिवास अर्जुन, नितीन मुंडावरे, राजेश साळवे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -