घरमहाराष्ट्रनाशिकचौदा महिन्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

चौदा महिन्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

गळ्याभोवती आढळून आल्या जखमा, घातपाताची शक्यता

नाशिक औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज नावाच्या इमारतीमध्ये चौदा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला जखमी अवस्थेत बालिकेला तिच्या कुटुंबीयांनी निमाणी जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅराडाईज अपार्टमेंट मध्ये वास्तव्याला असलेल्या पवार कुटुंबातील स्वरा मुकेश पवार या १४ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. तिच्या गळ्यावर जखमा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले असून याबाबत आडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. चिमुकलीच्या पालकांनी अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना दिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -