घरमहाराष्ट्रनाशिकसातपूर परिसरात डेंग्युच्या संशयित रुग्णांत वाढ

सातपूर परिसरात डेंग्युच्या संशयित रुग्णांत वाढ

Subscribe

डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, अंबड लिंक रोड, सावरकर नगर, जाधव संकूल या भागात आढळले संशयीत रुग्ण

सातपूर परिसरात डेंग्यूचे लक्षण असलेल्या संशयित रुग्णांची खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे सातपूर परिसरात डेंग्यूचा शिरकाव झाल्याने दिसून येत आहे. मागील वर्षी अशोकनगर येथील अक्षरा अमोल भोकरे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुद्धा या परिसरात डेंग्युचे तीसहून अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाला खडबडून जाग आली होती. प्रशासनाने नागरिक अथवा डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा अवलंब करून उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नितीन निगळ यांनी केली आहे.

दरम्यान, सातपूर भागातील काही खासगी तसेच शहरातील काही रुग्णालयांत डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत आहेत. काही संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुनेदेखील विविध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, अंबड लिंक रोड, सावरकर नगर, जाधव संकूल भागातील संशयीत रुग्ण आहेत. जुलै महिन्यात पावसाळा सुरू होताच डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन डेंग्यूची साथ पसरते की काय अशी भावना व्यक्त होत आहे. यासाठी मनपा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नितीन निगळसह ज्येष्ठ नागरिक करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -