‘वॉक फॉर लाइफ’ उपक्रमातून स्वराज फाउंडेशनने रचला अवयवदानाचा विश्वविक्रम

स्वराज फाउंडेशन आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या यांच्या संयुक्त उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद

Nashik
Avyavdan1
अवयवदान उपक्रमाला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद लाभला होता.

स्वराज फाउंडेशन आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वॉक फॉर लाइफ’ उपक्रमातून अवयवदानाचा विश्वविक्रम झाला. वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कॉलेज रोडवरील डॉन बॉस्को शाळेपासून सुरुवात झाली. त्यात डी.आय.डी.टी. कॉलेज, जी. डी. सावंत कॉलेज, जिल्हा शासकीय रुग्णालय, नामको चॅरिटेबल हॉस्पिटल, सॅव्ही कॉलेज, ब्लाइंड ऑर्गनायझेशन, बीव्हीजी इंडिया, रोटरी क्लब ऑफ नाशिक इस्ट, , आकार फाउंडेशन, समिज्ञा फाउंडेशन, दिव्य फाउंडेशन, शिवताल वाद्य पथक इ. संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर संजय चावला, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका आशा तडवी, नगरसेवक योगेश हिरे, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी, प्रीतिश छाजेड, डॉ. मनीष पाठक, आय.एम.ए.चे अध्यक्ष आवेश पलोड, सिनेअभिनेते अरमान ताहील, बाळासाहेब कंक्राळे, गोकुळ पिंगळे आदी उपस्थित होते.

अवयवदान जनजागृतीत स्वराज फाउंडेशन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी करेल, अशी अपेक्षा संस्थापक आकाश छाजेड यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय जोगळेकर यांनी केले. स्वराज फाऊंडेशनच्या संदेशदूत रंजीता शर्मा यांनी आभार मानले. या कार्यक्रमात नुपुर डान्स अकॅडमी, सह्याद्री हॉस्पिटलच्या परिचारकांनी नाटिकांमधून अवयवदानाबाबत प्रबोधन केले. विशेष म्हणजे वॉक फॉर लाईफ या रॅलीचे मार्गक्रमण अंध मुलांनीही केले.