नाशिक : रासायनिक खतांसोबत इतर खतांचे लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती संजय बनकर यांनी दिली. सभापती बनकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२३) जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्यासमवेत खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी व तालुकास्तरीय कृषी अधिकारी पंचायत समिती यांची खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरसीएफ झुआरी, इफको, कृभको, कोरोमंडल व इतर खत उत्पादक व पुरवठादार कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
सभापती बनकर यांनी एप्रिल व मेमध्ये खताचे शासनाकडून मिळालेल्या मंजूर वितरण (आवंनटन)नुसार झालेल्या पुरवठ्याची माहिती घेतली. त्यात आरसीएफ,कृभको व झुआारी या कंपन्यांनी युरिया खताच्या वितरण(आवंटन) प्रमाणे पुरवठा केल्याचे आढळून आले.इफको,कोरोमंडल,स्पाईक,जी