घरमहाराष्ट्रनाशिकतलाठी परीक्षा तब्बल २८ दिवस चालणार

तलाठी परीक्षा तब्बल २८ दिवस चालणार

Subscribe

शहरातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन परीक्षा केंद्रे

नाशिक जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार कक्षेत येणार्‍या तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या आधारे पात्र उमेदवारांची 1 जुलैपासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील 83 जागांसाठी तब्बल 28 दिवस ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या नियम व अटी इतर परीक्षांप्रमाणेच राहणार असून परीक्षार्थीला अर्ध्या ते दीड तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.

नाशिकसह राज्यातील पुणे, कोकण, औरंगाबाद, अमरावती व नागपूर अशा सहा प्रशासकीय विभागांमध्येे रिक्त असलेल्या 1543 जागांसाठी प्रत्येक ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 61 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच आदिवासी क्षेत्रात 22 जागा असून दोन्ही ठिकाणच्या जागांसाठी 1 जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन तास ऑनलाइन परीक्षा होणार आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षेची केंद्रे देण्यात आली आहेत. नाशिक शहरातील भोसला मिलिटरी महाविद्यालय, संदीप फाउंडेशन, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात केंद्रे देण्यात आली आहेत. उमेदवारांची संख्या तुलनेने जास्त असल्यामुळे तब्बल 28 दिवस ही परीक्षा सुरू राहणार आहे. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचे प्रमुख आव्हान महापरीक्षा पोर्टलसमोर राहील.

- Advertisement -

परीक्षा परिषदेला धास्ती

ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापरीक्षेने उमेदवारांच्या हॉल तिकिटात नमूद केले आहे. तसेच परीक्षेच्या काळात काही तांत्रिक अडचण आल्यास संचालक पूर्णत: मदत करतील. परीक्षार्थींना दुसर्‍या केंद्रावर बसण्याची व्यवस्था देखील करण्याची तयारी ठेवली आहे. मात्र, एवढे करूनही उमेदवारांना परीक्षेस बसता न आल्यास उमेदवारांना पुनर्परीक्षेसाठी दावा करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याउलट परीक्षार्थी केंद्र बदलण्यास किंवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास विरोध करत असेल, तर त्याची उमेदवारी रद्द करण्याची तंबी दिली आहे.

परीक्षेसाठी नियम

-परीक्षा केंद्रात कमाल दीड तास ते किमान अर्ध्या तास अगोदर उपस्थित राहणे.
-मोबाईल, गणकयंत्र, नोटबूक, पेजर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्यास बंदी.
-काळा व निळा बॉलपेन आणणे अत्यावश्यक.
-हॉलतिकिट व हजेरीपत्रावर एकच स्वाक्षरी असणे अनिवार्य.

- Advertisement -

हॉल तिकीट साठी येथे क्लिक करा..  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -