घरमहाराष्ट्रनाशिकमोदींच्या सभेसाठी दीड लाखांचे टार्गेट

मोदींच्या सभेसाठी दीड लाखांचे टार्गेट

Subscribe

मोदींच्या सभेबाबत उत्सुकता, पालकमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा

शिवसेना भाजप युतीच्या प्रचारार्थ पंतपधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे २२ एप्रिलला सभा होत आहे. त्यामुळे या सभेत मोदी काय बोलणार याविषयी जनमानसात उत्सुकता आहे. भाजप सेनेत या सभेमुळे उत्साहाचे वातावरण दिसू येत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या सभेच्या तयारी संदर्भात भाजप कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकार्‍यांनीही मंगळवारी (दि.१६) सभास्थळी पाहणी केली.

लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर आता चांगलाच वाढू लागला आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर नाशिकमध्ये राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार, तर नाशिकमध्ये सेनेचे हेमंत गोडसे निवडणूक रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी भाजपसह सेनेनेही आग्रह धरला होता. त्यानुसार आता पंतप्रधान मोदींची दिंडोरी येथे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २४ एप्रिलला संयुक्त सभा होणार आहे. आतापर्यंत मोदी यांच्या राज्यात झालेल्या प्रत्येक सभेतून त्यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. गत विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या तपोवन मैदानावर मोदींची सभा झाली होती. त्यामुळे आता मोदींच्या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघणार असून नाशिकच्या सभेत मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

या सभेचे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर असून महाजन यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक घेत तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी आपापल्या तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सभेला येण्याचे आवाहन त्यांनी केले. साधारणपणे एक ते दिड लाख लोक या सभेला उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. मोदी येणार असल्याने भाजपमध्ये चैतन्य संचारले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सभास्थळी भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सभेपूर्वी मैदानाची डागडुजी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच कोणत्याही संभाव्य आंदोलनाला सामोरे जावे लागू नये, याकरता उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -