घरताज्या घडामोडीशेतीनिष्ठ पुरस्कार तीन वर्षांपासून रखडले

शेतीनिष्ठ पुरस्कार तीन वर्षांपासून रखडले

Subscribe

राज्याच्या कृषी विभागामार्फत उत्कृष्ट शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार तीन वर्षांपासून रखडले आहेत. 2017 मध्ये निवड झाल्याचे शेतकर्‍यांना अद्याप हा पुरस्कार मिळलेला नसताना जिल्ह्यातील 12 शेतकर्‍यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे उत्कृष्ट पध्दतीने शेती करणार्‍या बळीराजाचा सरकारतर्फे सन्माण केला जातो.

कृषी विभागातर्फे निवडण्यात आलेल्या शेतकर्‍यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दिला जातो. आदिवासी व बिगर आदिवासी भागात नाविण्यपूर्ण शेती प्रयोग राबवणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराची सुरुवात झाली. 2017 मध्ये निवडलेल्या सिन्नर व बागलाण येथील दोन शेतकर्‍यांना अद्याप पुरस्कार प्राप्त झालेला नाही. जिल्हास्तरावर निवडलेल्या शेतकर्‍यांचे प्रस्ताव विभागस्तरावर पाठवले जातात.विभागातून दोन प्रस्ताव हे राज्यस्तरावर निवडले जात असतात. प्रत्येक वर्षी साधारणत: जुलै महिन्यात या पुरस्कारांची घोषणा होऊन राज्यपालांच्या हस्ते शेतकरी दाम्पत्याचा गौरव केला जातो. मात्र, 2017 मध्ये निवड होऊनही या शेतकर्‍यांना हा पुरस्कार अद्याप प्राप्त झालेला नाही. अशा परिस्थितीत यंदा पुन्हा प्रस्ताव मागवण्याचे काम सुरु झाले असून, शेतीनिष्ठ पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून 12 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -