व्हॉट्सअ‍ॅप’वर मिळवा हवे ते पुस्तक

लोकमुद्रा बहुउद्देशिय संस्थेची ‘वाचनाचा छंद’ ही अभिनव संकल्पना

Nashik

नाशिक : घरातून बाहेर पडण्यास बंदी घातल्यामुळे बहुतेक लोक कंटाळले आहेत. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून लोकमुद्रा बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे शंभर लोकांना एकत्रित करुन ‘वाचनाचा छंद’ हा उपक्रम सुरु केला आहे.
वाचनाची आवाड असलेल्या शंभर लोकांचा एक व्हॉट्स ग्रुप तयार केला जातो. त्या ग्रुपमधे ज्या व्यक्तीला पुस्तक हवे आहे, त्यांना ते पाठवले जाते. त्या पुस्तकावर रात्री चर्चा करून ग्रुपमधील लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्याचे हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातून लोकांना अवांतर वाचनाची सवय व्हावी लागेल. तसेच इतर मित्रही भेटतील, म्हणून हा उपक्रम राबवला जात असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष विशाल रणमाळे यांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7709623412 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.