घरताज्या घडामोडीशहराचा पाणीपूरवठा गुरूवारी बंंद

शहराचा पाणीपूरवठा गुरूवारी बंंद

Subscribe

गंगापूर धरणाच्या जॅकवेलला जोडणारी वीजवाहीनी भूमिगत करणे आणि मुकणे धरणाच्या मुख्य जलवाहीनीचा व्हॉल्व बदलणे या अतीगरजेच्या कामासाठी शहर व परिसरात गुरूवारी सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होणारा दैनंदिन पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारीही सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

गंगापूर धरणाच्या रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व १३२ केव्ही महींद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरून व जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीज पुरवठा कार्यान्वित आहे. ही वीज वाहीनी भूमिगत करण्यात येणार आहे. याकरीता महावितरणला सुलभरित्या काम करता यावे म्हणून गुरूवारी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जॅकवेल सुय करणे शक्य होणार नाही. तसेच पाथर्डीफाटा येथे पाणी पुरवठा वितरण विभागाकडून व्हॉल्व बसविण्याचे काम गरजेचे असल्याने मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गुरूवारी संपुर्ण नाशिक शहरातील सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. तर शुक्रवारी (दि.१०) रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -