घरमहाराष्ट्रनाशिकद्राक्ष निर्यातीची झेप दोन हजार कोटींकडे!

द्राक्ष निर्यातीची झेप दोन हजार कोटींकडे!

Subscribe

द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले असल्याने युरोपातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही स्थिती पाहता या वर्षीच्या निर्यातीत १५ ते २० टक्के वाढ होण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या द्राक्ष निर्यात हंगामाची दमदार सुरूवात झाली आहे. आतापर्यंत भारतातून युरोपीय बाजारपेठेसाठी ६१ कंटेनरमधून ८९० टन द्राक्षे रवाना झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची निर्यात तीन पटीने अधिक आहेत. द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले असल्याने युरोपातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही स्थिती पाहता या वर्षीच्या निर्यातीत १५ ते २० टक्के वाढ होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी भारतातून एकूण १७०० कोटीची निर्यात झाली होती. ही निर्यात यंदा दोन हजार कोटीचा टप्पा गाठेल, असा विश्वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातून ४२ हजार द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात ४ लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामासाठी महाराष्ट्रातून ४२ हजार तर, कर्नाटकातून ७७ द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यात अर्थातच नाशिक जिल्हा नोंदणीत आघाडीवर आहे. युरोपातील द्राक्ष निर्यातीसाठीही नाशिकनेच आघाडी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत झालेली निर्यात ही मागील हंगामाच्या तुलनेत तब्बल तीन पटीने अधिक आहे. मागील वर्षी ७ जानेवारीपर्यंत नाशिक जिल्ह्यातून १८ कंटेनरमधून २२५ टनांची निर्यात झाली होती. यंदा भारतातून युरोपात ६१ कंटेनरमधून ८९० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ही निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे हे विशेष !

- Advertisement -

युरोपातील या देशात झालेली द्राक्ष निर्यात (कंटेनर संख्या)

नेदरलॅन्ड – ४२
इंग्लंड – १२
फ्रान्स – ४
लॅटविया – १
पोलंड – १
ऑस्ट्रीया – १
एकूण – ६१

आपल्या द्राक्ष निर्यात हंगामाची सुरवात जोरदार झाली आहे. मागील वर्षी पेक्षा प्रमाण अधिक आहे. युरोपीय बाजारपेठेत सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व आहे. मात्र येत्या महिन्यात भारतीय द्राक्षांना मागणी वाढेल असे दिसते.
– विलास शिंदे, अध्यक्ष- सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -