घरमहाराष्ट्रनाशिकहिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पाची मुख्य भिंत कोसळली

हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पाची मुख्य भिंत कोसळली

Subscribe

सलग जोरदार पावसामुळे कमकुवत झाल्याने कोसळली भिंत, उर्वरित भिंत पाडून नवी उभारण्याची मागणी

मनमाडपासून जवळ असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पाची मुख्य संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला असून, उर्वरित भिंतदेखील पडण्याची शक्यता आहे. या भिंतीला खेटून असलेल्या मार्गावरून पानेवाडी गावातील ग्रामस्था ये-जा करतात त्यामुळे त्यांच्यासाठी भिंत धोकादायक झाली असून, भिंत पडल्यास मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर भिंत पाडून त्याजागी नवीन भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी पानेवाडीचे माजी सरपंच अंकुश कातकडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.

मनमाड पासून सात किमी अंतरावर पानेवाडी परिसरात 1998 साली सुमारे 100 एकरावर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा इंधन प्रकल्प उभारण्यात आला असून त्यातून रोज शेकडो टैंकर मधून राज्यातील वेगवेळ्या भागात पेट्रोल-डीझेलचा पुरवठा केला जातो.प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कंपनीने चारही बाजूंनी सुमारे 12 फुट उंची असलेली दगडी भिंत बांधली आहे. या भिंतीला खेटून पानेवाडी गावात जाण्यासाठी एकमेव रस्ता असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांसोबत ग्रामस्थांची वर्दळ असते. सलग जोरदार पावसामुळे कमकुवत झालेल्या या संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी या मार्गावर कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. उर्वरित भिंतदेखील जुनी असल्यामुळे ती कधीही कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पानेवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर भिंत धोकादायक झाली असल्याने ती पाडून नवीन भिंत बांधावी, शिवाय गावात जाण्यासाठी कंपनीने रस्त्यासाठी आणखी जागा सोडावी, अशी मागणी माजी सरपंच अंकुश कातकडे व ग्रामस्थांनी केली आहे.

दगडी भिंत धोकादायक झाली असल्याने त्याच्या जागी नवीन भिंत बांधण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायतीने कंपनीला वेळोवेळी दिलेले आहे मात्र कंपनी प्रशानाने त्याची दखल घेतली नाही.आता तरी कंपनी प्रशासने जागे होऊन नवीन भिंत बांधण्यात यावी अन्यथा ग्रामस्था तीव्र आंदोलन करतील.
– अंकुश कातकडे, माजी सरपंच, पानेवाडी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -