Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जेतवन नगरमधील नर्सरी पीपीपी तत्वावर होणार विकसित

जेतवन नगरमधील नर्सरी पीपीपी तत्वावर होणार विकसित

महापौर सतिश कुलकर्णी यांची माहिती

Related Story

- Advertisement -

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 20 मधील जेतवन नगर येथील महापालिका मालकीची नर्सरी सध्या अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे दुर्लक्षित झाल्याने सदर परिसरास बकाल स्वरूप आले आहे. या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर सदर परिसराचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

- Advertisement -

जेतवन नगर येथील नर्सरी पीपीपी तत्वानुसार विकसित करण्याकरिता महासभेने मान्यता दिली आहे. 2017 च्या विकास आराखड्यात सदरची जागा मेडिकल अँम्युनिटी रिझर्वेशन असून, आरक्षण क्रमांक 427 दर्शविले आहे. ही जागा 3455 चौरस मीटर असून प्रत्यक्ष मोजणीनुसार 27 हजार 687 चौरस मीटर आहे. त्यापैकी नर्सरीची जागा 14420 चौरस मीटर गार्डन तसेच जॉगिंग ट्रॅक 6300 चौरस मीटर आणि उर्वरित जागा 6960 चौरस मीटर मध्ये निसर्गोपचार केंद्राची जागा विकसित केलेली आहे. या जागेस दोन्ही बाजूंनी १८ मीटर व १२ मीटर डीपी रोड विकसित आहे. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येऊन हर्बल पार्क व महापालिकेची अत्याधुनिक नर्सरी विकसित करता येणार आहे.

- Advertisement -

जेतवन नगरमध्ये शहरातील एक आकर्षक हर्बल पार्क विकसित केल्यास शैक्षणिक सहली, पर्यटन, मनोरंजन केंद्र यांना देखील चालना मिळणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेला कुठलाही खर्च न होता प्रवेश आकारणी करातून महापालिकेस आर्थिक फायदा होणार आहे. साधारणत: 40 ते 50 लक्ष पावेतो याकामी महापालिकेची आर्थिक बचत होऊन नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा पुरविल्यास अंदाजे रक्कम रुपये १० लक्ष इतके वार्षिक उत्पन्न होणार आहे. यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट या निविदा पद्धतीने गुणात्मक प्रस्ताव प्राप्त होऊन त्याची छाननी केल्यानंतर उत्कृष्ट व आकर्षक प्रस्तावांना आर्थिक देकाराची विचारणा करण्यात येईल. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या गाईडलाईन नुसार 70 टक्के प्रस्ताव गुणात्मक व 30 टक्के आर्थिक धर्तीवर ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जेतवन नगर येथील नर्सरीच्या जागेत हर्बल पार्क व अत्याधुनिक नर्सरी विकसित झाल्यावर सदरच्या हर्बल पार्क व नर्सरी मधून शोभिवंत फुलांची, वेलींची, सुलभ आकाराच्या फुलांची कलमे, बॉर्डर साठी लागणारी रोपे व उद्यानात लागणारी विविध प्रकारची हिरवळ अर्थात लॉन इत्यादींची निर्मिती केल्यास त्याचा वापर मनपाच्या इतर उद्यानां करिता होणार आहे त्यामुळे उद्यान विकास किंवा देखभाल करण्यासाठी वरील सर्व वृक्ष लागवडीचा वापर करता येईल त्यामुळे मनपाची उद्याने, कार्यालये, इमारती परिसर, खुल्या जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे इत्यादींसाठी दर्जेदार व गुणात्मक सदृढ व सौंदर्यवान सुलभ सुशोभीकरण हरिती करण व महत्त्वाच्या इमारतींमध्ये किंवा फुलांच्या खालच्या भागात वर्टीकल ग्रीन वॉल उभारून शहराचे प्रदूषण कमी होउन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे तसेच यासोबतच विलायती जातीचे विविध प्रकारच्या ऑर्चिड, जरबेरा इत्यादीसाठी पॉलिहाऊस व ग्रीन हाऊस उभारण्यात येणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

महासभेच्या ठरावानुसार पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर जेतवन नगर नर्सरीजागेत हर्बल पार्क व अत्याधुनिक नर्सरी विकसित करणे, देखभाल करणे, दुरुस्ती व संचालन करणे याकरिता या क्षेत्रात काम करणार्‍या एजन्सीकडून नाशिक महानगरपालिका मधील उद्यानांची देखभाल, दुरुस्ती व संचलन हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर करण्यासाठी लवकरच ईनिविदा पद्धतीने निविदा मागविण्यात येणार असल्याचेही महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

- Advertisement -