घरमहाराष्ट्रनाशिकसीसीटीवी असूनही चोरीच्या घटना सुरुच

सीसीटीवी असूनही चोरीच्या घटना सुरुच

Subscribe

शहरात सीसीटीवी लावले असतानाही चोरीच्या घटना थांबतांना दिसत नाही. भोसला स्कूलमागील संत कबीरनगर झोपडपट्टीतील ज्योती संजय खरात यांचे कुटूंबीय बाहेर गेलेले असल्याचा डाव साधून चोरट्यांनी ही चोरी केली.

शहरातील घरफोडीच्या घटनांमुळे धास्तावलेल्या नागरिकांनी सुरक्षेसाठी सीसीटीवी यंत्रणा लावल्या असल्या तरीदेखील चोरट्यांनी आता त्यापुढे जाऊन आपला उद्योग सुरूच ठेवला असल्याची घटना पुढे आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडीत चोरट्यांनी किराणा मालासह घरापुढील रिक्षा व दुचाकीदेखील पळवून नेली. विशेष म्हणजे मागे कोणताही पुरावा सापडू नये, या साठी सीसीटीवी यंत्रणादेखील लंपास केली. या घटनेमुळे पोलिस चक्रावले आहेत.

दागीणे केलेत लंपास

भोसला स्कूलमागील संत कबीरनगर झोपडपट्टीतील ज्योती संजय खरात यांचे कुटूंबीय बाहेर गेलेले असल्याचा डाव साधून चोरट्यांनी ही चोरी केली. ही घटना २६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान घडली. चोरट्यांनी बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी घरातील जवळपास सर्वच सामान लंपास केल्याने खरात कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस देखील चक्रावले आहेत. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे सुरक्षितता म्हणून काही सोसायट्यांसह नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर सीसीटीवी यंत्रणा बसविली असली तरी आता या घटनेमुळे सुरक्षेच्या उपाययोजना देखील असुरक्षित असल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणी ज्योती खरात यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या वस्तूंची झाली चोरी

n घरातील फ्रीज, किराणा दुकानासाठीचा माल, दिड तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळे मंगळसूत्र, दोन सिलिंडर व एक गॅस शेगडी, होम थिएटर, घरापुढील पल्सर दुचकी (एमएच-१५, बीसी-४८६९) आणि रिक्षा (एमएच-१५, एके-६१४४) व कागदपत्र, तसेच तीन सीसीटीवी कॅमेरे आणि रॅकॉर्डर (डीव्हीआर).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -