घरताज्या घडामोडीयंदाचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर

यंदाचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर

Subscribe

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिकमध्ये पुरस्कारांची घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्‍या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

१० मार्च रोजी नाशिक येथे होणार्‍या विशेष सोहळयात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षाआड दिल्या जाणार्‍या जनस्थान पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यापूर्वी विजया राजाध्यक्ष, अरूण साधू, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विजय तेंडुलकर अशा दिग्गजाना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -