पायी जाणार्‍या देवीभक्तांवर काळाचा घाला; तीन ठार

चैत्र यात्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्‍या भाविकांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर दोन भाविक जखमी झाले.

Nashik
Truck and two wheeler accident in latur
प्रातिनिधीक फोटो

चैत्र यात्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्‍या भाविकांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर दोन भाविक जखमी झाले. मृतांत देवळा शहराजवळील गुंजाळनगर येथील १३ वर्षीय बालकाचा समावेश असून, अन्य दोघा मृतांची उशीरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.

जखमींवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी (१५ एप्रिल) पहाटे तीन वाजेच्या सुमारास कळवण जवळील कोल्हापूर फाट्याजवळ पायी गडावर जाणार्‍या भाविकांना भरधाव वेगाने जाणार्‍या (एम. एच.-१९, सी. एफ.-०७५१) या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तालुक्यातील गुंजाळनगर येथील शुभम बापू देवरे (वय १३) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य चार जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. गुंजाळनगर येथील शुभम हा तालुक्यातील खालप येथे आपल्या आत्याकडे गेला होता व तेथूनच इतर भाविकांबरोबर पायी गडावर जात होता. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृत शुभमच्या मागे आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here