अज्ञात वाहनाच्या धडकेत स्विफ्टमधील तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर

येवला तालुक्यातील सावरगाव फाट्याजवळ भीषण अपघात

Accident near Yeola

सावरगाव फाट्यावर रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत स्विफ्ट गाडीला भीषण अपघात होऊन त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीरजखमी झाले आहेत.

येवला तालुक्यातील धामोडे इथे सावरगाव फाट्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. पाच जण मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कारमधून येवल्याकडे येत होते. अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती की, धडक दिल्याने स्विफ्ट गाडीतील मागे बसलेले तिघेजण जागीच ठार झाले. तर पुढील दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. जोरात धडक बसल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यात कारच्या मागील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.