चोरचावडी धबधब्यात तिघे बुडाले; एकाला वाचवण्यात यश

वडाळीभोई येथील शुभम नारायण गुजर आणि ऋषिकेश शशिकांत तोटे अशी बुडालेल्या तरुणांची ओळख पटली आहे

deola death
चोरचावडी धबधब्यात तिघे बुडाले; एकाला वाचवण्यात यश

देवळा : तालुक्यातील दहिवड येथील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या चोरचावडी धबधब्यात रविवारी (दि. 13) तिघे बुडाल्याची घटना घडली. यातील एकास वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असून, त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. शुभम नारायण गुजर (वय 18, रा. वडाळीभोई) आणि ऋषिकेश शशिकांत तोटे (वय 18, रा. वडाळीभोई) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.