राजधानी एक्सप्रेसच्या वेळेत बदल

राजधानी एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून उशिरा सुटूनही वेळेच्या आत पोहोचणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Nashik

राजधानी एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून उशिरा सुटूनही वेळेच्या आत पोहोचणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. पूर्वी मुंबई- दिल्लीचा प्रवास १९.३० तास होता; आत्ता तो कमी होऊन १७.५५ झाला आहे.

दिल्लीवरून पुर्वी राजधानी एक्सप्रेस दुपारी ४.१५ ला निघून मुंबईला दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पोहचत होती. आत्ता ती ५.१५ मिनिटानी निघून मुंबईला दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५० ला पोहोचणार आहे. दिल्लीला गेल्यावर सकाळी १० च्या सुमारास जाऊन कार्यालयीन कामकाज आटोपून परत येण्यासाठी सायंकाळी राजधानी एक्सप्रेसची सोय झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणारी राजधानी एक्सप्रेस मुंबई- दिल्ली बुधवार व शनिवार आणि दिल्लीवरून गुरुवार व रविवारी धावते. प्रतिसाद चांगला मिळाल्यास दररोज एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील धावणार्‍या राजधानी एक्सप्रेसच्या बरोबरीने जाणार असल्याने मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍यांचा सुखकर प्रवास होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here