घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला मोदींच्या सभेला जाणाऱ्यांना झाली टोल माफी

नाशिकला मोदींच्या सभेला जाणाऱ्यांना झाली टोल माफी

Subscribe

पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, २२ एप्रिलला सकाळपासूनच चांदवड आणि पिंपळगाव टोल नाक्यावरुन वाहनांना मोफत सोडण्यात आले.

पिंपळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, २२ एप्रिलला सकाळपासूनच चांदवड आणि पिंपळगाव टोल नाक्यावरुन वाहनांना मोफत सोडण्यात आले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल फ्री करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरीही, मोफत प्रवासाच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांकडून टीका करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकला पंतप्रधान मोदी यांची सभा होत असल्याने, भाजप-युतीसह विरोधकांचेही या सभेकडे लक्ष लागले आहे. पिंपळगाव परिसरातील मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी नाशिक शहर, जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते येणार असल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, सोमवारी सकाळपासूनच वाहनांना टोल नाक्यांवरुन टोल न आकारताच सोडले जात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -