घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस आयुक्तालायच्या 'नाइट रनने' दोन तास ट्रॅफिक जाम

पोलीस आयुक्तालायच्या ‘नाइट रनने’ दोन तास ट्रॅफिक जाम

Subscribe

व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी ‘नाइट रन’ चे आयोजन करण्यात आले खरे; मात्र यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाममुळे नाशिककरांना दोन तास मोठाच मनस्ताप सहन करावा लागला. या नाइट रनसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. मात्र याविषयी फारशी जागृती न झाल्यामुळे लोकांनी नेहमीच्या मार्गावर आपली वाहने नेली. शहर पोलीस मुख्यालय मैदानापासून रात्री ९.४५ वाजता रनला प्रारंभ झाला. तत्पूर्वी रात्री ८.३० पासून पोलीस आयुक्त कार्यालय, गंगापूर रोड, कॉलेज रोड या रस्त्यांची डावी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

#Jointhechange Night Run for #tobaccofree #nashik #SayNoToTobacco #nashikpolice Ravinder Singal

Posted by Nashik City Police on Sunday, 30 December 2018

- Advertisement -

मात्र याविषयी नागरिकांना फारशी माहितीच नसल्याने त्यांनी आपली वाहने या रस्त्यापर्यंत आणली. परिणामतः एका बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. पोलीस आयुकांनी अशा प्रकारचे उपक्रम दुपारच्या वेळेत राबवावेत, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -