घरमहाराष्ट्रनाशिकबिऱ्हाड मोर्चा आज नाशिकमध्ये धडकणार; सहा जणांची प्रकृती खालावली

बिऱ्हाड मोर्चा आज नाशिकमध्ये धडकणार; सहा जणांची प्रकृती खालावली

Subscribe

आदिवासी शाळांमध्ये वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणार्‍या अडीच हजार शिक्षकांनी सोमवारी ११ फेब्रुवारीस सोग्रस फाटा येथून काढलेल्या पायी बिर्‍हाड मोर्चाला आता वेगळे वळण लागते आहे. दरम्यान, शहराच्या परिघात पोहोचलेल्या मोर्चाला आसरा देण्यास लॉन्सधारकांनी नकार दिल्याने, आंदोलकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

आदिवासी शाळांमध्ये वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणार्‍या अडीच हजार शिक्षकांनी सोमवारी ११ फेब्रुवारीस सोग्रस फाटा येथून काढलेल्या पायी बिर्‍हाड मोर्चाला आता वेगळे वळण लागते आहे. चार दिवस उलटूनदेखील शासनाने दखल घेतली नाही म्हणून मोर्चेकर्‍यांनी रस्त्यावरील गाड्यांसमोर झोपत सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, शुक्रवारी नाशिकच्या परिघात पोहोचलेल्या बिर्‍हाड मोर्चातील सहा जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदिवासी शाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांना कायम करण्यासाठी राज्य शासनाकडे विशेष भरतीची मागणी केली. यासाठी चार वर्षांपूर्वी ऐन कडाक्याच्या थंडीत एक महिना उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील २७ हजार पात्रताधारकांनी अर्ज केले आहेत. मात्र, त्यात गुणांकन पद्धत लागू केल्यामुळे मानधनावरील शिक्षक वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. भरती प्रक्रिया स्थगित करून मानधनावरील सर्व जाती, धर्माच्या शिक्षकांना अगोदर न्याय द्यावा, या मागणीसाठी संपूर्ण राज्यातून अडीच हजार महिला, पुरुष शिक्षकांनी सोमवारपासून पायी बिर्‍हाड मोर्चा काढला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत हा मोर्चा ओझर येथे पोहोचला. मात्र,सरकार दखल घेत नसल्यामुळे आंदोलक दुखावले आहेत. त्यांनी सरकारचा निषेध करीत ओझर जवळ दोन तास रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना बाजूला करत एकमार्गी वाहतूक सुरू केली.

- Advertisement -

आंदोलक व पोलीस यांच्यात वारंवार धुमश्चक्री उडाल्याने, वाहतूक व्यवस्थेला अनेकदा अडसर निर्माण झाला. सायंकाळपर्यंत हा खेळ सुरू राहिल्यामुळे आंदोलकांना आगेकूच करता आले नाही. अखेर ओझरपासून एक किलोमीटर अंतरावर त्यांनी मुक्काम केला. यातील शीतल बामणे, संतोष कापुरे, गणेश गिरासे, किरण पाडवी, पंकज वसावे यांची प्रकृती बिघडली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘नो रिस्पॉन्स’

दरम्यान, शिक्षकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले होते. त्यासाठी शिष्टमंडळाचे अध्यक्ष रितेश ठाकूर, उपाध्यक्ष हेमंत पावरा, कमलाकर पाटील, भगतसिंग पाडवी, आशिष वाडीले, हर्षल बिरारी आदी चर्चेसाठी जाणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आल्याने चर्चेचा मुद्दा पुन्हा लांबला.

- Advertisement -

RastaRoko1

मोर्चातील महिलांनी थेट महामार्गावर झोपून रस्ता रोखला होता.

 

RastaRoko2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -