घरमहाराष्ट्रनाशिकसुभेदाराचा प्रशिक्षणार्थी जवानावर अत्याचार

सुभेदाराचा प्रशिक्षणार्थी जवानावर अत्याचार

Subscribe

आर्टिलरी सेंटरमधील घटनेने खळबळ

येथील आर्टिलरी सेंटरमधील सुभेदाराने एका प्रशिक्षणार्थी लष्करी जवानावर मसाज करण्यास सांगत दोन दिवस अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पीडित जवानाने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सांगली येथील १९ वर्षीय प्रशिक्षणार्थी जवान २२ एप्रिलपासून उपनगर येथील आर्टिलरी सेंटरमधील थ्री एटीआर-८ बॅटरी या विभागात प्रशिक्षण घेत आहे. १३ जुलैला दुपारी ४ वाजता सुभेदार महेश पांडे यांच्याकडे सेवक ड्युटीवर गेल्यानंतर सुभेदार झोपलेले होते, पीडित जवान आत गेल्यावर पांडे यांनी जवानाला कपाटावरील तेल घेऊन मसाज करण्यास सांगितले. असेे केल्यास ट्रेनिंगमध्ये पास करण्याचे आमीष दाखवले.

- Advertisement -

जवानाने मसाज करण्यास सुरुवात केली असता सुभेदार पांडे याने अश्लिल चाळे करून अमानुष अत्याचार केला. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास ट्रेनिंगमध्ये नापास करण्याची धमकी दिली. ट्रेनिंग पुन्हा करायला लागेल म्हणून जवानाने कुणालाच सांगितले नाही. सुभेदार पांडे यांनी पुन्हा १५ जुलैला जवानास शिविगाळ, मारहाण करत अत्याचार केला. यावेळी जवानाचा एक मित्र त्याला शोधत आला असता सुभेदाराने पुन्हा धमकी दिल्याची तक्रार उपनगर पोलिसांत दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -