वाहतुकीसाठी वाहनांना आरटीओतर्फे मिळणार प्रमाणपत्र, स्टिकर

rto office bandra

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यासाठी सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी, यासाठी आरटीओतर्फे प्रमाणपत्र व स्टिकर दिले जाणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र देण्यासाठी परिवहन आयुक्तांनी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  आरटीओतर्फे वाहनांना स्टिकर दिले जाणार असून ते वाहनांच्या समोर दर्शनी भागावर लावावे लागणार आहे. ते स्टिकर आरटीओ तर्फे दिली जाणार आहेत.

चालक, कामगारांची यादी सोबत ठेवा

वाहतुकदारांनी चालक व कामगारांना ओळखपत्र द्यावे किंवा संघटनेच्या लेटर हेडवर व्यक्तींची नावे लिहून ते वाहनासोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूकदारांना अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  मदतीसाठी कार्यालयाचा संपर्क क्रमांक 022-22614724 प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 नियंत्रक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक

26 मार्च रोजी सकाळी 9.45 ते 6.30 वाजेपर्यंत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके मो. 9423606565, कर्मचारी योगेश मोरे मो.7744837744.

27 मार्च रोजी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत अधिकारी सुरेंद्र निकम मो.8879394711 कर्मचारी समीर शिरोडकर मो.8308119477

28 मार्च रोजी विनोद दळवी मो. 9146494954 कर्मचारी अनिल धात्रक मो.8149370760

29 मार्च रोजी हर्षल डाके, कर्मचारी विजय सोळसे मो. 8446465456

30 मार्च रोजी अधिकारी राहुल कदम मो. 7350510404

31 मार्च रोजी सुरेंद्र निकम, कर्मचारी हेमंत देशमुख मो.9423373246