घरमहाराष्ट्रनाशिकरस्त्यातील अडथळ्यांनी घेतला दोघांचा बळी

रस्त्यातील अडथळ्यांनी घेतला दोघांचा बळी

Subscribe

रस्त्यातील अडथळ्यांनी रविवारी, ५ मे रोजी दोन मोटरसायकलचालकांचा घेतला बळी

वाहतूक नियमांबाबत पोलिसांकडून व्यापक प्रबोधन केले जात असले तरीही, महापालिकेकडून बेफिकीरपणे केली जाणारी चेंबर्सची कामे आणि अनधिकृतपणे रस्त्यावरच पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांचा गंभीर प्रश्न कायम आहे. रस्त्यातील अशाच अडथळ्यांनी रविवारी, ५ मे रोजी दोन मोटरसायकलचालकांचा बळी घेतला.

vikas aajbe
विकास आजबे

पहिली घटना पाथर्डीफाटा ते पाथर्डीगावदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर घडली. रविवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीसांचे पथक गस्त घालत असताना अचानक मोठा आवाज आल्याने पोलिसांनी त्यांचे वाहन घटनास्थळाकडे वळविले. त्या ठिकाणी एका खड्ड्याभोवती लावलेल्या संरक्षक बॅरिकेडला धडकून दुचाकीचालक विकास बबन आजबे (२४, रा. विराटनगर, सातपूर-अंबड लिंकरोड) गंभीर जखमी अवस्थेत चेंबरच्या खड्डयात पडल्याचे पोलिसांना दिसले. पोलीस कर्मचारी अमजद पटेल व त्यांच्या सहकार्‍यांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खड्डयातून बाहेर काढले. उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विकासच्या ताब्यातील अपघातग्रस्त पल्सरची अद्याप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदही झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत सातपूरच्या श्रमिकनगरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका आयशर ट्रकवर अक्षय गवळी याच्या दुचाकीची (एम.एच १५, जीटी ४८५१) जोरदार धडक झाली. त्यात अक्षयच्या डोक्याला गंभीर मार लागला व दुचाकी ट्रकच्या खाली गेली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चार महिन्यात ६३ बळी

नाशिक शहरात जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांत झालेल्या ५९ अपघातांत ६३ वाहचालकांचा बळी गेला आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करुनच वाहने चालवावीत, यासाठी व्यापक प्रबोधन केले जात आहे. मात्र, तरीही बहुतांश वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -