घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील ९ शाळांची होणार चौकशी

शहरातील ९ शाळांची होणार चौकशी

Subscribe

नाशिक पॅरेंटस असोसिएशनच्या तक्रारीनंतर यंत्रणेला जाग, दोन त्रिसदस्यीय समित्या गठीत

शिक्षण हक्क अर्थात आरटीई कायद्याचं उल्लंघन करणार्‍या शहरातल्या ९ इंग्रजी माध्यम शाळांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी दोन त्रिसदस्यीय समित्यांची नियुक्ती केली आहे.

गेल्या सात वर्षांतील प्रवेशप्रक्रिया आणि लेखापरीक्षण करुन त्याचा अहवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि विशेष कार्यकारी अधिकारी विजय बोरसे यांना सादर केले जाणार आहेत. नाशिक पॅरेंटस असोसिएशनच्या माध्यमातून शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी शिक्षण राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आता केंब्रिज, सेंट लॉरेन्स, सेंट फ्रान्सिक, होली फ्लॉवर, विज्डम हाय, गुरु गोविंद सिंग, अशोका युनिवर्सल या शाळांची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -