घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नरजवळील अपघातात घराकडे परतणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

सिन्नरजवळील अपघातात घराकडे परतणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

Subscribe

सिन्नर -शिर्डी महामार्गावर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या दुचाकी व कार यांच्यातील अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. खोपडी गावाजवळ हा अपघात झाला.

सिन्नर -शिर्डी महामार्गावर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या दुचाकी व कार यांच्यातील अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. खोपडी गावाजवळ हा अपघात झाला.

अपघातात मृत्यू झालेले दोघेही युवक मुसळगाव येथील सुपर इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. अनंत नवनाथ यादव (३२) व पांडुरंग नामदेव पवार (३३) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही रात्रपाळी संपवून दुचाकीने गावाकडे परत येत असताना खोपडी गावाजवळ हॉटेल आम्रपालीनजीक समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघात दोघांनाही गंभीर इजा होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे वल्हेवाडी, कहांडळसह वावी परिसरावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -