घरमहाराष्ट्रनाशिकट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुण जागीच ठार

ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुण जागीच ठार

Subscribe

गंगापूर-गिरणारे रोडवरील आबाळेवाडीनजीक शनिवारी (९ फेब्रुवारी) तीन वाजेच्या सुमारास ट्रक-मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोन तरुण जागीच ठार, तर दोन पादचारी गंभीर जखमी झाले. गतिरोधकावरुन जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळून हा अपघात झाल्याचे सांगितले जाते आहे.

गंगापूर-गिरणारे रोडवरील आभाळाची वाडीनजीक शनिवारी (९ फेब्रुवारी) तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल दुभाजकावर आदळून ट्रकखाली आल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले. तर रस्त्याने जात असलेले दोन जण गंभीर जखमी झाले. गतिरोधकावरुन जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलनजीक असलेल्या खरवळ येथील गोटीराम शेवरे (२४) व काकडदरी येथील त्र्यंबक राऊत (२५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे दोघेही एका मोटरसायकलवरुन नाशिककडून गिरणारेच्या दिशेने निघाले होते. आबाळेवाडीनजीक असलेल्या गंगापूर पाटानजीक रस्त्यावरील गतिरोधकावरुन जाताना मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. याचवेळी पलिकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या ट्रकखाली ते आल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाला त्यावेळी रस्त्याकडेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथील पांडुरंग देवराम टोपले (३०) आणि कैलास काशिनाथ माळेकर (२२) हे दोघेही पायी जात होते. दुभाजकावरून अनियंत्रित झालेली दुचाकी थेट या दोघांच्या अंगावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत केली. या रस्त्यावरील गतिरोधक हा धोकादायक असल्याने, यापूर्वीही या ठिकाणी अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ठळक सूचनाफलक लावावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -