पीकअप व खासगी ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात दोन तरुण ठार

टायर फुटल्याने पीकअप वाहन दुभाजक तोडून बसवरआदळले

मुंबई महामार्गावरील गोंदे गावाजवळ पिकअप आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांत रविवारी (दि. ८) मध्यरात्री भीषण अपघात झाला. त्यात पीकअप वाहनातील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार पिकअपचं टायर फुटल्यानं पिकअप दुभाजक तोडून मुंबईकडून नाशिककडे येणार्‍या लक्झरी बसवर जाऊन आदळली. या अपघातात पिकअपमधील दोघं तरुण जागीच ठार झाले. त्यातील किरण बर्‍हे हे आधारवड, तर योगेश वाजे हे खेड्चे रहिवाशी होते. या अपघातात बसमधले ८ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय. या जखमींवर उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये भाजीपाला विकल्यानंतर पीकअप इगतपुरीच्या दिशेनं जात होती. दुर्दैवं म्हणजे काल किरणचा वाढदिवस होता आणि याच दिवशी त्याच्यावर काळानं झडप घातली.