विसर्जनासाठी गेलेले दोन युवक पाण्यात बुडाले

Five drowned in Nashik district
Five drowned in Nashik district

गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेले दोन युवक पाण्यात बुडाले, यापैकी एक जणाला वाचविण्यात यश आले असुन दुस-याचा शोध सुरु आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, गजानन पार्क, सिन्नर फाटा येथील काही युवक मंगळवारी(दि.१) दुपारी साडेतीन वाजता गणपती विसर्जनासाठी चेहेडी व बेलतगव्हाण शिवारात वालदेवी नदीच्या संगमावर गेले होते. कुटुंबासह गणपती विसर्जन करण्यासाठी गेले होते, मात्र यावेळी अजिंक्य गायधनी याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय खडकावरुन निसटल्याने खोल पाण्यात पडला. अजिंक्य बुडत असतांना त्याला वाचविण्यासाठी चरण कुंडलीक भागवत (२५) याने अजिंक्यला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली, परंतू चरण भागवतही पाण्यात बुडायला लागला. मासेमा-यांनी त्यांच्या जवळील ट्यूब चरणच्या दिशेने फेकत त्याला वाचविण्यात त्यांना यश आले, स्थानिक नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला व पोलीसांना पाचारण केले. वालदेवी नदीचा प्रवाह तीव्र असल्याने याठिकाणी बचाव दलाला शोध कार्यात अडथळा येत आहे.