घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

Subscribe

शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, स्वाईन फ्लू सदृश आजाराने रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात नऊ रुग्ण गंभीर आहेत. त्यांना रूग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, स्वाईन फ्लू सदृश आजाराने रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात नऊ रुग्ण गंभीर आहेत. त्यांना रूग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यात पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. स्वाइन फ्लू कक्षात जानेवारी महिन्यापासूनच सातत्याने रुग्ण दाखल होत असल्याने आरोग्य विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मनोहर शंकर नेरकर (४८, रा.राधाकृष्णनगर, सातपूर), शरद जाधव (मखमलाबाद) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नेरकर यांना तीन दिवसांपूर्वीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी (२२) त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र, मोठा कालावधी खासगी रूग्णालयात गेल्याने त्यांनी उपचारांस प्रतिसाद दिला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. अहवाल निगेटिव्ह असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

वातावरणातील चढ-उतार स्वाइन फ्लू आजारासाठी पोषक ठरत आहे. आजाराचा विषाणू प्रत्येक ऋतूमध्ये कमी-अधिक प्रमाणात आपले अस्तित्व टिकवून ठेवत असल्याचे रुग्णालयांमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षात आठ रुग्ण असून सहा पुरूष व दोन महिला आहेत. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या बाबींचा समावेश आहे. या अंतर्गत विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेय स्तरावर जनजागृती मोहीम आदींची कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अमलात आणण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.

राज्यात १९ बळी

दीड महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूचे १९ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आढळल्याची माहिती आहे. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता शुक्रवारी १५ फेब्रुवारीस आरोग्य मंत्रालयातर्फे राज्यभरात पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा आदेश दिला आहे. स्वाइन फ्लूचा धोका लक्षात घेता वेळीच सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.

- Advertisement -

रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण समोर येत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. वातावरणातील सातत्याने होणार्‍या बदलामुळे हे घडते. मुळात प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. जिल्हा रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षातील रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी. शंका वाटल्यास तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयातून तपासणी करून घ्यावी.
– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -