घरमहाराष्ट्रनाशिकजादा व्याजाच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक

जादा व्याजाच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक

Subscribe

इंदिरानगर पोलिसांनी पाच जणांवर केला गुन्हा दाखल

विम्याचा ११० टक्के बोनस व बँकेच्या व्याज दरापेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष पाचजणांनी एकाल् दाखविले. त्यांच्या विश्वास ठेवत एकाने तब्बल ७८ लाख २५ हजार ५४८ रूपये गुंतवले. मात्र, त्यांना व्याज व बोनस काहीच मिळाले. त्यातून फसवणूक झाल्याचे एकाच्या लक्षात आले. ही घटना लोटस अपार्टमेंट, श्री जयनगरसमोर, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी मुकुंद रामचंद्र साठे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसणुकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राज मित्तल, आर. के. टंडण, नचिता मेहरा, रजत दीक्षित, राकेश शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विम्याचा ११० टक्के बोनस व विम्याचे गुंतवलेले पैसे बँक दरांपेक्षा जास्त रक्कम देतो, असे आमिष पाचजणांनी संगनमत करून मुकुंद साठे यांना दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवत साठे यांनी त्यांना ७८ लाख २५ हजार ५४८ रूपये दिले. मात्र, त्यांना पाचजणांनी बोनस, व्याज दिले नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. साठे यांनी त्यांच्याकडे मूळ रक्कम परत करण्याची मागणी केली असता पाच जणांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -