घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या दोन उपनिरीक्षकांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

नाशिकच्या दोन उपनिरीक्षकांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Subscribe

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील ४९ पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील ४९ पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास मोहिते यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत १०७ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ७५ पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि ६१३ पोलिसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण ४९ पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरिक्त महासंचालक एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -