घरमहाराष्ट्रनाशिकउमेश यादवने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

उमेश यादवने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Subscribe

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू उमेश यादव याने सोमवारी, २३ एप्रिलला त्र्यंबकेश्वरी जाऊन दर्शन घेतले.

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू उमेश यादव याने सोमवारी, २३ एप्रिलला त्र्यंबकेश्वरी जाऊन दर्शन घेतले. यादवच्या दौऱ्याबाबत गुप्तता बाळण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना आणि करिष्मा कपूर यांनीही सहकुटुंब त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. त्यामुळे कलाकारांबरोबरच खेळाडूंच्या मनात त्र्यंबकेश्वराप्रति असलेली भक्ती आणि आकर्षणही यानिमित्ताने दिसून आले. अभिनेत्री करिना आणि करिष्मा कपूर आई बबिता आणि मुलांसह नाशिकला आलेले होते. नाशिकरोड येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर उमेश यादवने भेट दिल्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वराचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -