केंद्रीय अन्न सुरक्षा नियंत्रण संस्थेच्या सदस्यपदी विलास शिंदे यांची नियुक्ती

कृषी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

Nashik

मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांची ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ (‘एफ.एस.एस.ए.आय.’) या संस्थेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने अन्नप्रक्रिया उद्योग, ग्राहक प्रतिनिधी, संशोधन संस्था, खाद्य प्रयोगशाला, कृषि या क्षेत्रातील प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. त्याच बरोबर सर्व राज्यातील अन्नसुरक्षा आयुक्त हे देखील या समितीचे सदस्य असतात. शिंदे यांची कृषी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IMG_20190409_195412
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे

अन्नसुरक्षेबाबत जगभरातून जागरुकता वाढली आहे. यातील जागतिक मानकांनुसार अन्ननिर्मितीवर जगभरातून भर दिला जात आहे. अन्नसुरक्षा हा भारतातील कृषिक्षेत्रासमोर आव्हान म्हणून उभा आहे. येत्या काळात हा सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेती व्यवस्थेतील बदलाचे मॉडेल उभे करणाऱ्या विलास शिंदे यांची ‘एफएसएसएआय’ च्या सल्लागार समितीवर नियुक्ती झाली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत अन्न सुरक्षा व मानदंड अधिनियम, 2006 अंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय.) ची स्थापना करण्यात आली आहे.

या आहेत एफ.एस.एस.ए.आय. च्या जबाबदाऱ्या

  • अन्न पदार्थांशी निगडित व्यवसाय करणाऱ्या सर्व उद्योग-व्यवसायांना या संस्थेकडून लायसन्स / रजिस्ट्रेशन करून घेणे.
  • अन्न सामग्रीसाठी विज्ञान-आधारित मानक तयार करणे.
  • अन्न पदार्थांचे उत्पादन, स्टोअरेज, वितरण, विक्री आणि आयात इत्यादींवर नियंत्रण ठेवणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here