घरमहाराष्ट्रनाशिकतडीपार आदेशाचे उल्लंघन करणे पडले महागात

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे पडले महागात

Subscribe

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना शुभूम सूर्यवंशी न्यायालय व संबंधित शासकीय अधिकार्‍याची परवानगी न घेता देवळाली गावातील राहत्या घरी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

   गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी; नाशिकरोड पोलिसांची कारवाई
वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे तडीपारीची कारवाई केलेला गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत व तडीपार आदेशाचे उल्लंघन करत घरातच वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येताच नाशिकरोड पोलिसांनी त्याला अटक केली.

       रविवारी (दि.२७) राजवाडा, देवळाली गावामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई कुंदन तोताराम राठोड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५, रा.राजवाडा, देवळाली गाव, नाशिकरोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्‍या व्यक्तीकडून वारंवार गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी शुभम सूर्यवंशी यास २ जून २०२० रोजी नाशिक शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना शुभूम सूर्यवंशी न्यायालय व संबंधित शासकीय अधिकार्‍याची परवानगी न घेता देवळाली गावातील राहत्या घरी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याने तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -