डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली; विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या जागेवर धडाकेबाज कामगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांच्या बदलीची जोरदार चर्चा आहे. डॉ. सिंगल यांनीही आपली बदली झाल्याची शक्यता वर्तवत, तसे आदेश मात्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.

Nashik
Vishwas_Nangre_Patil
विश्वास नांगरे-पाटील, डॉ. रवींद्रकुमार सिंगल

नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या जागेवर कोल्हापूर येथे पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा आहे. डॉ. सिंगल यांनी बदली झाल्याची शक्यता वर्तवत, तसे आदेश मात्र प्राप्त झाले नसल्याचे ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.

पोलिसांबद्दल सर्व स्तरांतील जनतेत विश्वास निर्माण करतानाच बाल गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी नाशिकमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविणारे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली होणार असल्याचे संकेत होते. त्यातच शुक्रवारी, २२ फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या जागेवर आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांच्या बदलीची जोरदार चर्चा आहे. मुंबईवर २६-११ ला जो हल्ला झाला त्यात ताज हॉटेलमध्ये शिरणारे नांगरे-पाटील हे पहिले पोलीस अधिकारी होते. आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळे प्रसिद्ध असलेले नांगरे-पाटील विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसाठी विविध शहरांत मार्गदर्शन करतात. दरम्यान, नाशिकमध्ये डॉ. सिंगल यांच्या पुढाकारातून २४ फेब्रुवारीला पोलीस मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. बदली झाली तरीही या मॅरेथॉनची जबाबदारी पूर्ण करून आपण नव्या ठिकाणी जाऊ, असेही डॉ. सिंगल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here