घरमहाराष्ट्रनाशिकसटाणा शहराला केळझर, हरणबारीतून पाण्याची मागणी

सटाणा शहराला केळझर, हरणबारीतून पाण्याची मागणी

Subscribe

आमदार दीपिका चव्हाण यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. बागलाण तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे केळझर आणि हरणबारी धरणातील मृत साठ्यातून सटाणा शहराला 12 हजार लिटर क्षमतेचे 15 टँकर व नामपूरसाठी दहा टँकर सुरु करण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी (दि.14) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. बागलाण तालुका कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट होतो. पावसाळा सुरु होऊन दीड महिने झाले तरी येथे समाधानकारक पाऊस झालेला नाही. तालुक्यातील हरणबारी, केळझरसह चणकापूर, पुनद धरण क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सटाणा शहर आणि नामपूर वगळता ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अजूनही टँकरची मागणी कायम असल्यामुळे भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीला चणकापूर, पुनद, हरणबारी, केळझर या धरणांमध्ये पाणी शिल्लक नसल्यामुळे आवर्तन सोडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. सटाणा व नामपूर या नागरी भागात गेल्या 45 दिवसांत नळांना पाणीच येत नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांना केळझर व हरणबारी धरणांमध्ये असलेल्या मृत साठ्यातून सटाणा शहरासाठी 12 हजार लिटर क्षमतेचे 15 टँकर व नागपूरसाठी 10 टँकर सुरु करण्याची मागणी आ.चव्हाण यांनी केली आहे.

कृत्रिम पाऊस पाडा

बागलाणसह मालेगाव, देवळा, कळवण या तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. पावसाअभावी शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून, शेतकरी आत्महत्या सुध्दा वाढत आहेत. पाण्याअभावी शहरातील नागरीक ग्रामीण भागात स्थलांतरीत होत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -