घरमहाराष्ट्रनाशिकअवैध वाळू उपशांमुळे संकट गहिरे

अवैध वाळू उपशांमुळे संकट गहिरे

Subscribe

सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे मोसम नदीत अवैध वाळू उपशाामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून कडक उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे मोसम नदीत अवैध वाळू उपशाामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून कडक उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर मोसम नदीवरील फुलाच्या दोन्ही बाजूस वाळू उपसा झाल्याने पुलास मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

यंदा मार्चपासून विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाळू उपशामुळे कमालीची घट झाली आहे. नदीपात्रात गाढव, ट्रॅक्टर, बैलगाडी महसूल विभागाची परवानगी न घेता रात्रंदिवस वाळू उपसा होत आहे. वाळू माफियांना ग्रामपंचायत विभागाने व तलाठी कार्यालयाकडून अनेकदा सूचना देऊनही त्यांची मुजोरी वाढली आहे. बैलगाडी व गाढवांचा वापर करून वाळूचा नदीपासून थोड्या अंतरावर डेपो मारला जातो. या ठिकाणाहून रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू टाकून बाराशे रुपये ब्रास किंवा तीन ते चार हजार रुपये ट्रॅक्टरप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात बिनधास्तपणे विक्री होत आहे. सध्या निवडणुकीचे कामकाज चालू असल्याने महसूल विभाग सदर कामास व्यस्त पाहून वाळू माफिया यांचे मोठ्या प्रमाणात फावले आहे. विंचूर -प्रकाशा राज मार्गावरील मोसम नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम केले. सदर पुलाच्या खाली पायाजवळ वाळू उपसा झाल्यामुळे पुलास धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या आजूबाजूस पाचशे मीटरपर्यंत वाळू उपसा करू नये, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयास पत्र दिले आहे. तरीसुद्धा वाळू उपसा बंद सुरू असल्यामुळे पाणीटंचाईचा कठीण प्रसंग निर्माण झाला आहे.

- Advertisement -

विहिरींनी गाठला तळ

ताहाराबाद गावासह पिंगळवाडे, करंजाड पाणी पुरवठा योजना विहिरींनी वाळू उपशामुळे तळ गाठला आहे. संबंधित विभागाने ताहाराबाद येथील अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी श्रावण साळवे, दिगंबर साळवे, जगन्नाथ साळवे, दीपक कांकरिया, दीपक चौधरी, गुलाब नंदन, विजय भामरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -