घरमहाराष्ट्रनाशिकजानेवारीतच पाणी टंचाईच्या झळा तीव्र; जिल्हयात ४३ टक्के जलसाठा

जानेवारीतच पाणी टंचाईच्या झळा तीव्र; जिल्हयात ४३ टक्के जलसाठा

Subscribe

४८६ गावांना १२२ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील धरणांतील जलसाठ्यांत झपाट्याने घट होत असून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हा जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळयात टंचाईच्या अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील सहा महीने उपलब्ध जलसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

यंदा जिल्ह्यात सरासरी ८३ टक्के पाऊस नोंदवला गेला. त्यातही मध्यंतरी मराठवाडयातील जायकवाडीला नाशिकमधून पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यात डिसेंबरअखेर टँकरने शंभरी पार केली. आजमितीस जिल्ह्यात ४८६ गावांना १२२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून या गावातील सुमारे तीन लाख नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून आहे. ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाई निर्माण झाली. जिल्ह्यातील ७ मोठे आणि १७ मध्यम, अशा २४ प्रकल्पांची साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट आहे. मात्र, आजमितीस या प्रकल्पांत २८ हजार ५७८ दशलक्ष घनफुट म्हणजेच ४३ टक्केच जलसाठा आहे. दैनंदिन पाण्याची गरज भागवताना आता हा साठाही कमी होऊ लागला आहे. आगामी काळात उन्हाचा तडाखा वाढणार असून त्याप्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, गळतीचे प्रमाण वाढेल. त्याचबरोबर पाण्याची मागणीही मोठया प्रमाणावर वाढणार आहे. यापरिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबर पाण्याची चोरी रोखण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याचा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

- Advertisement -

गंगापूर समूहात ६६ टक्के पाणी

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात आजमितीस ५८ टक्के पाणी शिल्लक आहे. अर्थात महापालिकेला गंगापूर धरणात ३१ जूलैपर्यंतचे आरक्षण मंजूर केले आहे. त्यामुळे शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट सध्या तरी नसले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे जुलैपर्यंत थेब न थेंंबाचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. गंगापूर धरणात आजमितीस ३२८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ४३७७ दशलक्ष घनफुट साठा शिल्लक होता. कश्यपीमध्ये ९४ टक्के तर गौतमी गोदावरीत ६५ टक्के, आळंदी धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूणच समूहात ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -