घरमहाराष्ट्रनाशिकसैनिकांच्या शौर्याचा पुरावा मागणार्‍यांना निवडून देणार का?

सैनिकांच्या शौर्याचा पुरावा मागणार्‍यांना निवडून देणार का?

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमधील भाजपा-शिवसेना युतीच्या मनोमिलन मेळाव्यात खडा सवाल

शिवसेना, भाजपसारखे पक्ष राष्ट्रवादाला महत्व देताय, तर विरोधीपक्ष आमच्या सैन्याच्या शौर्याचा पुरावा मागताय, त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय, अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांना सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हल्ल्यापूर्वी सैन्याला मोकळीक दिली. ही ताकद यापूर्वीच्या नेतृत्वात नव्हती, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या मनोमिलन मेळाव्यात केला.

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले, सैन्याच्या शौर्याला सार्थ मानून राष्ट्रअभिमानाने उभे राहणारे पक्ष एकीकडे आणि सैन्याला प्रश्न विचारणारे पक्ष दुसरीकडे, अशी स्थिती आहे. त्यातून कोणाला निवडून द्यावे हे जनतेनेच ठरवावे. एकीकडे भाजप, शिवसेनेसारखे एनडीएतील पक्ष ज्यांच्यासमोर राष्ट्रवाद हाच मुद्दा आहे. दुसरीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. २००८ मध्ये याच महाराष्ट्रात बाँम्बस्फोट झालेत. त्यानंतर तेव्हाच्या राज्य आणि केंद्रातील सरकारने पाकिस्तानचा केवळ तीव्र निषेध केला. त्यानंतर पाकिस्तानने उरीत हल्ला केला, तेव्हा आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला. काश्मीरात दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे काम सेनेने केले. पुलवामा येथे हल्ला करून सैनिकांना शहीद केले. यावेळी मोदींनी सैन्यदलाला सांगितले, आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला पाहिजे. त्यानुसार शिवसेनेने कर्तृत्व गाजवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

वाकडं शेपूट कापून टाका- उद्धव ठाकरे

भारतावर वारंवार हल्ला करणार्‍या पाकिस्तानला चांगली अद्दल घडवण्याची आता वेळ आली आहे. पूर्वीसारखे डरपोक सरकार नसून उरी येथे हल्ला होताच भारताने सर्जिकल स्ट्राईक केले. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्यापेक्षा पाकिस्तानचे वाकडे शेपूट कायमस्वरुपी कापून टाका, असे आवाहन करत ठाकरे यांनी आपल्या सैनीत तेवढी ताकद असल्याचे सांगितले. सैन्याला मोकळीक दिली तर पाकिस्तानच काय चीन सुद्धा वाकडी नजर करून बघू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकमधील जागा सेनेच्याच उमेदवारास

या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील आठही उमेदवार जाहीर होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेनेचा आणि भाजपचा खासदार आहे, तेथे त्याच पक्षांना उमेदवारी दिली जाईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे नाशिकमधील जागा भाजपला सोडण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -