घरमहाराष्ट्रनाशिकआमदार गवितांचा सेनाप्रवेश मुक्रर?

आमदार गवितांचा सेनाप्रवेश मुक्रर?

Subscribe

मतदारसंघात जोरदार चर्चा; निष्ठावंताचा विरोध

इगतपुरी/त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून हाती शिवबंधन बंधणार, या चर्चेने सध्या तालुक्यात जोर धरला आहे. गावित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त चार दिवसांपासून मतदारसंघात वार्‍यासारखे पसरले आहे. ‘मातोश्री’ वर येत्या मंगळवारी अधिकृत प्रवेश सोहळा होणार असल्याचे खात्रीलायक वृत आहे. दोन पंचवार्षिक निवडणुकीत गावितांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातील कार्यकर्ते मात्र, चक्रावून गेले आहे. याबाबत गावित परिवाराकडून कुठलाही ठोस अभिप्राय मिळत नसल्याने सर्वच कोमात गेले आहेत. रविवारी (१८ ऑगस्ट) आमदार निर्मला गावित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून कार्यकर्त्यांकडून हिरवा सिग्नल मिळताच शिवसेना प्रवेश कधी, कुठे याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता निकटवर्तियांकडून दिली जात आहे.

असे असले तरी तालुक्यातील काही शिवसैनिकांनी गावितांच्या सेना प्रवेशास विरोध केला आहे. गावितांचा सेना प्रवेश झालाच आणि तिसर्‍यांदा आमदार झाल्याच तर काही जुन्या शिवसेना पदाधिकार्‍यांना आपले महत्व कमी होईल, याची भीती वाटत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची काँग्रेस पक्षाची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली असताना राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या दबावापोटी हाती शिवबंधन बांधावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

सुरुवातीला त्या भाजपा त जाणार, अशी चर्चा होती. मात्र, याबाबत त्यांनी वारंवार इन्कार केला. परंतु, आता चार-पाच दिवसांपासून मात्र, त्या पक्षांतराच्या चर्चे बाबत अत्यंत द्विधामनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात त्यांचे मतदारसंघातील हक्काचे शिलेदार पक्षांतर करण्यास विरोध करत असल्याचीही चर्चा आहे. जवळपास ९० टक्के कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गावितांसोबत शिवसेना प्रवेश करणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. याचा सोक्षमोक्ष मंगळवारी लागेल. तथापि काही निष्ठवंत पक्षातच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फायदा आगामी निवडणुकीत कुणाला होणार? हे काही दिवसांत स्पष्ठ होणार आहे.

सेना- राष्ट्रवादी पदाधिकारी विरोधात

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पंचायत समिती माजी सभापती गोपाळ लहांगे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरामण खोंसकर, विनायक माळीकर आदी शिवसेना, राष्ट्रवादी पदधिकार्‍यांची शुक्रवारी नाशकात बैठक झाली. यावेळी गावितांच्या सेना प्रवेशाचा विरोध पुढे आला आहे. माजी आमदार मेंगाळ हे सेना उमेदवारीचे दावेदार असून गावित सेनेत आल्यास त्यांची उमेदवारी फायनल होऊ शकते. या धसक्याने मेंगाळ यांचीही धावपळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -