घरमहाराष्ट्रनाशिकविनापरवानगी मदत संकलित करणे बेकायदा - जिल्हाधिकारी सूरज मांढरे

विनापरवानगी मदत संकलित करणे बेकायदा – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Subscribe

पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याचे आवाहन

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने होत्याचे नव्हते झाले. अद्यापही या जिल्हयांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. याव्दारे आर्थिक मदत स्विकारण्यात येत आहे. मात्र धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत स्विकारता येत नसल्याचे जिल्हाधिकारयांनी स्पष्ट करत ज्या नागरीकांना पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करावयाची आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ही मदत बँकेव्दारे जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत पिडीतांना मदतीच्या भावनेने अनेक नागरीक सढळ हाताने मदत करतात मात्र ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचेलच याबाबत मात्र कोणीही शाश्वती देउ शकत नाही. अर्थात याला काही संस्था अपवाद असतीलही मात्र कोल्हापूर जिल्हाधिकारयांनी किंवा शासनाने पूरग्रस्तांना मदत करावी असे कोणतेही आवाहन केले नसतांना मदतीचा महापूरच आला आहे. यात अनेक राजकिय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत मदत केंद्र, मदत फेरीच्या माध्यमातून आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदत संकलित केली जात आहे. नाशिकमध्येही दोन डझनहून अधिक संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केेले आहे. अद्याप या जिल्हयांमध्ये पाणी न ओसरल्याने सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासनालाही पूर्ण यश आलेले नाही. त्यात आता राज्यभरातून मदतीचा महापूरच आल्याने कोल्हापूर प्रशासनही बुचकळयात पडले आहे.

- Advertisement -

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदत स्विकारली जात आहे. मुळात अशी मदत स्विकारतांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे अशी परवानगी एकाही संस्थेने घेतल्याचे दिसून येत नाही त्यामुळे याव्दारे नागरिकांची लुबाडणूक करण्याचा प्रकार घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी २००८ च्या महापूराच्या परिस्थितीत अशाच प्रकारे सामाजिक संस्थांकडून मदत संकलित करण्यात आली; परंतु त्यातील किती मदत गरजूंपर्यंत पोहोचली, याबाबत साशंकता आहे. यामुळे नागरिकांनीही केवळ भावनिक आवाहनाला न जुमानता आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मदतीच्या माध्यमातून चमकोगिरीला ऊत

मुळात पुरग्रस्त जिल्हयांमध्ये अद्याप वीज पुरवठाही सुरू होउ शकलेला नाही. अनेक नागरीकांच्या घरात अजूनही पाणी आहे असे असतांना सामाजिक संस्थांकडून गहू, तांदूळ असे धान्य संकलित केले जात आहे जर वीज पुरवठाच बंद हे दळण दळणार कोठून तसेच हे नागरीक अद्याप आपल्या घरात जाउ शकलेले नसतांना साहीत्य ठेवणार कोठे याचे जराही भान या संस्थाकडून बाळगण्यात आलेले नाही. तसेच काहीजण तर घरातील फाटके कपडे, वापरात नसलेले कपडेही मदतीत देत असल्याने पूरग्रस्तांची ही चेष्टाच होत असल्याचे दिसून येते. मदतीच्या माध्यमातून काहीजण तर चमकोगिरी करून घेत असल्याचेही दिसून येत आहे.

- Advertisement -

पूरग्रस्तांना मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीतच जमा करावी

कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत स्विकारण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यामुळे परवानगीशिवाय जर रक्कम स्विकारली जात असेल तर ते कारवाईस पात्र आहे. पूरग्रस्तांसाठीच नव्हे तर कोणत्याही सण, उत्सवसांठीही अशा प्रकारने विनापरवानगी रक्कम स्विकारता येत नाही. नागरीकांनी पूरग्रस्तांना मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीतच जमा करावी – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

येथे करा रोख मदत

  • अकाउंट नंबर -1097243351
  • आएफएससी कोड – SBIN0000300
  • स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -