देशीदारू विक्री करणाऱ्या महिलेला अटक

अवैध दारू विक्री केंद्रावर १५ बॉक्स जप्त, अंविनापरवाना अवैधरित्या देशी दारूचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका महिलेला अटक केली.

Nashik
CrimeIssue
प्रातिनिधिक फोटो

विनापरवाना अवैधरित्या देशी दारूचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका महिलेला अटक केली. आठवलेनगरातील या छाप्यात पोलिसांनी ३७ हजार ४९४ रूपयांचे १५ बॉक्स जप्त केले.

यशोदा राजेश देवकर (रा. आठवलेनगर, चुंचाळे, रामकृष्णनगर, अंबड-सातपूर लिंकरोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यशोदा देवकर ही आईच्या घरात देशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत पत्र्याच्या शेडमध्ये दारूच्या बाटल्या दिसल्या. छाप्यात १५ बॉक्समध्ये ४८ काचेच्या १८० मिली सीलबंद बाटल्या आढळून आल्या. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे, पोलीस हवालदार संपत सहादू सानप, महिला होमगार्ड रेखा राजगुरू, कांता मिसाळ, अविनाश देवरे, आव्हाड, वजीरे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here