घरमहाराष्ट्रनाशिक’एफएसआय’ कमी करणार, घरे स्वस्तच राहणार

’एफएसआय’ कमी करणार, घरे स्वस्तच राहणार

Subscribe

एकीकृत बांधकाम नियमावलीबाबत क्रेडाईच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नाशिकएकीकृत बांधकाम नियमावलीतील नाशिकसाठीचा एफ.एस.आय. टेबल वगळून तो इतर शहरांप्रमाणेच केला जाईल. तसेच, इतर पार्किंग व अ‍ॅमेनिटी स्पेसचे नियमदेखील संपूर्ण राज्यासाठी शिथील करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शिष्टमंडळाला रविवारी, १७ मार्चला दिले.

प्रस्तावित नियमावलीतील जाचक अटींबाबत क्रेडाईच्या शिष्टमंडळाने नाशिक दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. तसेच, या अटींमुळे बांधकाम क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत संघटनेचे अध्यक्ष उमेश वानखेडे व कार्यकारी मंडळाने चर्चा केली. राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी प्रकाशित केलेल्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीत नाशिकला वेगळे टाकत स्वतंत्र महापालिकेसाठी स्वतंत्र एफ. एस. आय.चे नियम लादले आहेत. अ‍ॅमेनिटी स्पेसबाबतही असाच दुजाभाव केला आहे. व्यापारी संकुलांसाठी प्रस्तावित पार्किंगचे नियम कठोर असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नाशिक शहराचा एफ. एस. आय.साठीचा स्वतंत्र टेबल वगळण्यात येऊन तो इतर शहरांप्रमाणेच कायम राहील, तसेच इतर पार्किंग व अ‍ॅमेनिटी स्पेसचे नियम संपुर्ण राज्यासोबत शिथिल करण्याचाही शब्द दिला. महानगरपालिकेने या नियमावलीची अंमलबजावणी अंतीम मंजुरीनंतरच करावी, अशी सूचनाही केल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, क्रेडाई नाशिकचे उमेश वानखेडे, रवी महाजन, कृणाल पाटील, नितीन वानखेडे, अनिल आहेर, ऋषिकेश कोते, अंजन भलोडीया, अतुल शिंदे, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -